Posts

Showing posts with the label कविता

The Road Not Taken

Image
ही अप्रतिम क विता जगप्रसिद्ध कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या The Road Not taken या कवितेचे मराठी भाषांतर आहे.. वाट अशी मी न घेतली/ The Road Not Taken चालत असता दिशा दूरची अडखळलो थोडा एकदिशी समोर होत्या वाटा दोन एक डावी अन एक उजवी थांबून थोडा पाहुनी गेलो वाट मग एक सुंदरशी पर्णराजी आच्छादित अन् लोक चालले त्यावरूनी दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन् उजाडशी वहिवाटही नसे तिथे अन् भासे गूढ वलयाची.... होते माहीत मजला हेही पहिली वाट सोयीची दुसरी वाट पाहे वाट अखंडित पण पथिकांची अभिमानेही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची धाडस करुनी परिश्रमांते वाकविले मी दैवाही...