विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला,. अजुन अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही..
ही अप्रतिम क विता जगप्रसिद्ध कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या The Road Not taken या कवितेचे मराठी भाषांतर आहे.. वाट अशी मी न घेतली/ The Road Not Taken चालत असता दिशा दूरची अडखळलो थोडा एकदिशी समोर होत्या वाटा दोन एक डावी अन एक उजवी थांबून थोडा पाहुनी गेलो वाट मग एक सुंदरशी पर्णराजी आच्छादित अन् लोक चालले त्यावरूनी दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन् उजाडशी वहिवाटही नसे तिथे अन् भासे गूढ वलयाची.... होते माहीत मजला हेही पहिली वाट सोयीची दुसरी वाट पाहे वाट अखंडित पण पथिकांची अभिमानेही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची धाडस करुनी परिश्रमांते वाकविले मी दैवाही...
१ फेब्रुवारी २०२१ रोजी, उत्साहाने, जव्हारच्या कोर्टात जाण्यासाठी मी घरातून बाहेर निघालो . जव्हारला पोचल्यावर अगदी अर्धा तास शोध-शोध केल्यानंतर अखेरीस कोर्ट सापडला, कारण Google Map वर चुकीचे ठिकाण दाखवत होते व मी भलत्याच ठिकाणी जावून कोर्ट शोधत होतो. तोंडाला लावलेला मास्क व्यवस्थित आहे याची खात्री केली आणि हाताला Sanitizer लावला आणि गळ्यात कॉलेजचा ID CARD घातला व कोर्टामध्ये प्रवेश केला. कोरोना काळ असल्याने आत मध्ये जास्त गर्दी नव्हती. आत मध्ये जावून मी कोर्टरूम शोधत होतो इतक्यात एका सफेद शर्ट-पेंट घातलेल्या कोर्टातील कर्मचाऱ्याने मला थांबवले आणि " काय काम आहे ? " म्हणून विचारले. "मी Law Student आहे आणि कोर्टातील कामकाज कसे चालते ते मला बघायचे आहे म्हणून मी कोर्टात आलो आहे" असं मी त्यांना अगदी उत्साहाने सांगितलं आणि कोर्टरूम कुठे आहे म्हणून विचारल. साधारणपणे ५ मिनिटे त्यांचाशी बोलण झाल. त्यांनी माझा कॉलेज बद्दल व मी कुठे राहतो याबद्दल विचारपूस केली. तसेच LLB अभ्यासक्रमासाठी कसा प्रवेश घ्यायचा ? त्या साठी कोणती परीक्षा द्यावी लागते का ? आपल्या भाग
खूप खूप वर्षांपूर्वी ... विक्रमगड हायस्कूल मध्ये शिकत असताना एकदा एक शिक्षक, शिकवता शिकवता सहज म्हणाले होते की " शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये "!. तेव्हा हे वाक्य माझ्या पहिल्यांदा ऐकण्यात आले होत. तेव्हा त्यांच म्हणण पटलही होत, कारण सर म्हणत आहेत तर बरोबरच असेल. पण आता मी जेव्हा स्वतः कायद्याचे शिक्षण घेत आहे आणि आता दोन गोष्टी जरा जास्त चांगल्या प्रकारे समजतात. तर आता ह्या वाक्याशी मी अजिबात सहमत नाही. " शहाण्या ने कोर्टाची पायरी चढू नये " हे म्हणजे अस झाल की आजारी पडल्यावर दवाखान्यात जावू नये.. किंवा तहान लागल्यावर पाणी पिऊ नये... इत्यादी... इत्यादी... समजा तुमच्या सोबत अन्याय झाला आणि तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची नाही मग तुमच्या पुढे दोनच पर्याय राहतात : १) एक तर झालेला अन्याय गपचूप सहन करा किंवा २) स्वतः कायदा हातात घेऊन काहीतरी बेकायदेशीर कृत्य करा वगेरे.. आणि हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत.. उलट गरज असेल तेव्हा , शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली पाहिजे (कायदेशीर मदत घेणे) असच मी म्हणेन ! नक्कीच पोलीस प्रशासनात भ्रष्ट अधिकारी/कर्म
दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां ( दवाखान्यात जावू नका कोरोनाची लस घेवू नका, दवाखान्यात इंजेक्शन देऊन डॉक्टर मारून टाकत आहेत ) सध्या साधारणपणे अशा प्रकारची वाक्ये ग्रामीण भागात लोकांच्या तोंडून सहज ऐकायला मिळत आहेत. वय वर्ष 45 च्या पुढील सोबतच आता 18 वर्ष पुढील वयोगटातील व्यक्तिंसाठी आता कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण ग्रामीण भागातील लोंकांचे लस घेण्याचे प्रमाण कमीच आहे. लोकांच्या मनात लसी विषयी भीती आणि चुकीची माहिती आहे. कालची गोष्ट आहे, माझे मामा ज्यांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त आहे ते बांधन गावाकडे लसीकरण कॅम्प लागला होता तिथे जाऊन लस घेऊन आले. तिथे सुद्धा लसी विषयी स्थानिक लोकांची उदासीनता होती. लसीचे अगदी 150 डोस उपलब्ध होते, त्यातील फक्त साधारणपणे 20 डोस संपले होते आणि ते सुद्धा शहरातून व आजूबाजूच्या तालुक्यातुन आलेल्या लोकांनी संपवले होते. तिथले स्थानिक लोक लस घेण्यासाठी येत नव्हते. जर तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमच्या आजूबाजूला लोकांच्या मनात लसी विषयी भीती आणि उदासीनता असेल तर तुम्ही खालील गोष्टी क
(Photo credit : Wolfgang Wuster) सर्पदंशाने सर्वात जास्त रुग्ण मृत्यु पावणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर लागतो. भारताला सर्पदंश मृतांची राजधानी म्हणून ओळखलं जात. २००१ ते २०२० या वीस वर्षांच्या कालावधीत भारतात १० ते १२ लाखापेक्षा जास्त मृत्यु हे सर्पदंशाने झाले आहेत. भारतात दरवर्षी साधारणपणे ५०००० (पन्नास हजार ) बळी हे सर्पदंशाने जातात. (प्रत्यक्षात आकडा जास्त असु शकतो. यात ग्रामीण भागातील घरीच मृत्यु पावलेल्या रुग्णांची नोंद नाही.) सर्पदंश ही प्रामुख्याने ग्रामीण समस्या असल्याने आतापर्यंत ही समस्या दुर्लक्षितच राहिली आहे अस मी म्हणेन. आणि हि प्रचंड संताप जनक बाब आहे. सर्पदंशाचा सर्वात जास्त धोका हा तरुण शेतकरी आणि लहान मुले यांना असतो. पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाचे प्रमाण सर्वात अधिक असते. या काळात मनुष्य आणि साप यांचा जास्त संबंध येत असतो. भारतात सर्पदंशास सर्वात जास्त कारणीभूत मुख्य चार साप आहेत त्यांना The Big Four म्हणून ओळखले जाते. A) घोणस (Russell Viper) B) नाग (Indian Cobra) C) फोडसा/ फोरसे (Saw Scaled Viper) D) मन्यार (The common Krait ) भारतात सर्पदंशाने
(Epidemic Disease Act 1897) सध्या कोरोनाची साथ जगभर पसरली असताना आपल्याला सध्या लागु असलेल्या एका १२३ वर्ष जुन्या कायद्या बद्दल ऐकायला मिळते.. ह्या कायद्या बद्दल आणि त्या मागच्या इतिहासाबद्दल अगदी थोडक्यात : १८९७ साली ब्रिटिश सरकारने हा कायदा अंमलात आणला. हा कायदा खूप छोटा आहे ज्या मध्ये फक्त 4 sections आहेत.. जेव्हा देशात/राज्यात घातक साथीचा रोग पसरला आहे किंवा पसरण्याची शक्यता आहे आणि हा प्रसार रोखण्यासाठी दुसरे असलेले कायदे प्रभावी पणे काम करत नाहीत अशा वेळेस हा कायदा लागू केला जातो. अशा वेळेस परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार विशेष नियम ,कायदे व उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपात अंमलात आणते... त्या नियमांचे पालन न केलेल्या व्यक्तीस IPC Sec 188 नुसार कारवाई होवु शकते ह्या कायद्या नुसार प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार मिळतात . मात्र कायद्याचे पालन करत असताना अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही . अशा वेळेस अधिकारी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते. काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्या काळात ह्या कायद्याचा दुरुपयोग कर
बोईसर : स्वदिच्छा साने MBBS चे शिक्षण घेत असणारी २२ वर्षीय होतकरू तरुणी, दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई बांद्रा (Band Stand ) येथून बेपत्ता झाली होती. बोईसर पासून परीक्षेला मुंबईला गेलेली तरुणी परत घरी परतलीच नाही. ह्या केस मध्ये एकमेव संशयित होता मिठ्ठू सिंग . त्याने स्वदिच्छा ला शेवटचे बघितले होते तसेच तिच्या सोबत शेवटचा सेल्फी घेतला होता . असे असताना सुद्धा त्या वेळेस पोलिसांनी मिठ्ठू सिंग ची सखोल चौकशी न करता क्लीन चीट देऊन सोडून दिले होते. किवा त्या घटनेचा पाहिजे तसा तपास केला नाही. नंतर ती केस क्राईम ब्रांच कसे सोपवण्यात आली असता आता त्या केस मध्ये नवीन उलगडा झाला. आता संशयित मिठ्ठू सिंग ने स्वदिच्छा ची हत्त्या करून बॉडी समुद्रात फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे . सदर घटने मध्ये आता पोलिसांकडून बॉडी शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत मात्र इतक्या वर्षानंतर आता पुरावे सापडतील अस वाटत नाही. मुळात पोलीस यंत्रणेच हे मोठ अपयश आहे . सुरुवातीच्या काळात जेव्हा स्वदिच्छा बेपत्ता झाली होती तेव्हा मात्र पोलिसांकडून FIR दाखल करताना टाळाटाळ झाली. "कि तरुण मुलगी आहे कोणास
अपघाता विषयीचा GOOD SAMARITAN कायदा काय आहे नक्की समजून घ्या : रस्त्याने जात असताना एखाद्याचा अपघात झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला काय चित्र दिसते ? बहुतेक माणस थांबतात , काय झाल.... ? काय झाल .... म्हणून बघतात. फोटो काढतात . सेल्फी काढतात. आणि उभ राहून फक्त बघत बसतात. जखमीला मदत करण्याची इच्छा तर सगळ्यांची असते, पण "उगीचच पोलिसांची कटकट नको , काय झाल तर आपण फसू" अशी भीती असते म्हणून जखमीला मदत करण्यासाठी सहसा पटकन कुणी पुढे येत नाहीत. आपल्या देशात वर्षभरात, रोड अपघातात साधारणपणे १,५०,००० (दीडलाख) अपघातग्रस्ती मृत्युमुखी पडतात. त्यातले निम्मा म्हणजे ७५००० जखमींचा जीव यासाठी जातो कारण त्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. कारण मदतीसाठी पटकन कुणी पुढे येत नाही. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीसाठी सुरुवातीचा १ तास अतिशय महत्वाचा असतो . त्याला सुर्वर्ण काळ म्हटले जाते. या दरम्यान जखमी व्यक्तीला जर उपचार मिळाले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. या गोष्टीवर उपाय म्हणून आपल्याकडे अतिशय महत्वाचा असा GOOD SAMARITAN कायदा आहे ज्या बद्दल लोकांना खूपच कमी माहिती आहे . ( Motar