शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !


खूप खूप वर्षांपूर्वी ... विक्रमगड हायस्कूल मध्ये शिकत असताना एकदा एक शिक्षक, शिकवता शिकवता सहज म्हणाले होते की "शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये"!. तेव्हा हे वाक्य माझ्या पहिल्यांदा ऐकण्यात आले होत. तेव्हा त्यांच म्हणण पटलही होत, कारण सर म्हणत आहेत तर बरोबरच असेल.

पण आता मी जेव्हा स्वतः कायद्याचे शिक्षण घेत आहे आणि आता दोन गोष्टी जरा जास्त चांगल्या प्रकारे समजतात. तर आता ह्या वाक्याशी मी अजिबात सहमत नाही.

"शहाण्या ने कोर्टाची पायरी चढू नये" हे म्हणजे अस झाल की आजारी पडल्यावर दवाखान्यात जावू नये.. किंवा तहान लागल्यावर पाणी पिऊ नये... इत्यादी... इत्यादी...
समजा तुमच्या सोबत अन्याय झाला आणि तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची नाही मग तुमच्या पुढे दोनच पर्याय राहतात :
१)एक तर झालेला अन्याय गपचूप सहन करा     किंवा 
२)स्वतः कायदा हातात घेऊन काहीतरी बेकायदेशीर कृत्य करा वगेरे..
आणि हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत..
उलट गरज असेल तेव्हा , शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली पाहिजे  (कायदेशीर मदत घेणे) असच मी म्हणेन !

नक्कीच पोलीस प्रशासनात भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी आहेत तसेच कर्तव्यनिष्ठ अधिकारी/कर्मचारी पण आहेत. 
न्यायालयात  काहीक खटले वर्षानुवर्षे पण चालतात .. 
बऱ्याचदा पोलीस स्टेशन ला जावून आपली निराशा होते हवे तसे सहकार्य पोलिसांकडून मिळत नाही.
ह्या सगळ्या  गोष्टी तर आहेतच..

इंग्लिशमध्ये  एक वाक्य आहे  We fear the Unknown ! म्हणजे  माहिती नसलेल्या गोष्टी विषयी आपल्याला भीती असते..
पोलीस प्रशासन आणि न्यापालिका विषयी आपण घाबरून असतो त्याच एक महत्वाच कारण हे पण आहे की मुळात आपल्याला ह्या गोष्टींविषयी फार कमी ज्ञान असते . आणि कधी पोलीस स्टेशन/ न्यायालयात जाण्याची वेळ आलीच तर आपण खूप घाबरून जातो काय कराव ते माहिती नसते.
कारण आत्तापर्यंत आपण पोलीस स्टेशन आणि  न्यायपालिका ह्या संस्थाकडे नकारात्मक दृष्टीकोनातून बघून पूर्णपणे दुर्लक्षित केलेले असते.

तुम्ही कितीही योग्य पद्धतीने गाडी चालवा तरीसुद्धा कधी कधी दुसर्याच्या चुकीमुळे तुमच्या गाडीचा अपघात होवू शकतो तसच 
आपण समाजात वावरत असताना आपण कितीही सरळ मार्गाने चालत असलो तरी कधी कधी दुसऱ्या व्यक्तीमुळे आपण अडचणीत येऊ शकतो. आणि पर्यायाने आपला पोलिस-न्यापालिका यांचाशी संबंध येत असतो.

पोलीस स्टेशन, न्यापालिका ह्या आपल्या समाजव्यवस्थेतील अतिशय महत्वाच्या संस्था आहेत. यांचाकडे दुर्लक्ष न करता त्या कशा प्रकारे चालतात ते समजून घेतले पाहिजे, महत्वाच्या कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे. 
उलट जेव्हा-जेव्हा  वेळ मिळेल तेव्हा आपण,  आपल्या जवळच्या कोर्टात जावून कोर्टामध्ये  कामकाज कस चालत ते नक्कीच बघितल पाहिजे, समजून घेतल पाहिजे.  

कोर्टाचे न्यायनिर्णय (judgements) वाचले पाहिजेत त्यामध्ये न्यायाधीशांनी एखादा खटला कसा चालला, त्यामध्ये निर्णय काय दिला , आणि तो निर्णय  देण्या मागचे कारण काय ह्या सर्व बाबी सविस्तर पणे लिहलेल्या असतात. हे न्यायनिर्णय https://districts.ecourts.gov.in/ ह्या website वरून अगदी मोफत डाऊनलोड करता येतात.

नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे:

१) भारत खटले इतकी वर्षे का चालतात ? न्यायनिर्णय देण्यास इतका उशीर का ?

उत्तर : मुख्य कारण म्हणजे न्यायाधीशांची कमतरता. 
भारतीय लोकसंखेनुसार आपल्या कडे जेवढे  न्यायाधीश हवेत  त्या पेक्षा निम्मेच न्यायाधीश आहेत. त्यामुळे न्यायाधीशांवर कामाचा बोझा खूपच जास्तच आहे. पर्यायाने निकाल द्यायला उशीर होतो.
येत्या काळात न्यायाधीशांची रिक्त पदे भरली जातील आणि आपल्याला ह्या बाबतीत नक्कीच चांगला  बदल दिसेल.

२) पूर्ण खटले चालवून सुद्धा आरोपी सुटून जातात , त्यांना शिक्षा होत नाही . मग कोर्टात जाण्याला काय अर्थ आहे ?

उत्तर : हो , बऱ्याचदा पुराव्या अभावी आरोपी सुटून जातात हे खर आहे. पण आपण त्या आरोपीस कायद्याच्या चौकटीत उभे केले हि खूप महत्वाची  बाब आहे. त्या आरोपीच्या मनात कायद्याविषयची भीती निर्माण करणे हे सुद्धा महत्वाच आहे. परत चुकीच काम करण्यास तो आरोपी दहा वेळा विचार करेल , हि सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. 
तुम्ही कायद्याची मदत घेणे म्हणजे तुम्ही अन्याय स्वीकारणार नाही अशा प्रकारचा एक इशाराच असतो.


अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर शहाण्या माणसाने पोलीस-स्टेशन ,कोर्ट  यांकडे सकारत्मक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे, आपले अधिकार , कायद्यांविषयी जागरूक राहले पाहिजे त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा शहाण्या माणसाने नक्कीच कोर्टाची पायरी चढली पाहिजे  !!
 
-समाप्त ..


.... आणि भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट असा, नुकताच प्रदर्शित झालेला  "जय-भीम" सिनेमा एकदा  नक्कीच बघा..

....आणि माझ्या   "Tushar Lahange"  YouTube चानेल ला subscribe करा येत्या काळात मी कायदेविषयक Videos बनवणार आहे..
-

Popular posts from this blog

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही

The Road Not Taken

जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...

दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां

सर्पदंश : एक गंभीर दुर्लक्षित समस्या

F.I.R. / Arrest

साथीचा रोग प्रतिबंधक कायदा आणि त्या मागचा इतिहास

Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update

GOOD SAMARITAN LAW