GOOD SAMARITAN LAW


अपघाता विषयीचा  GOOD SAMARITAN कायदा काय आहे नक्की समजून घ्या :




रस्त्याने जात असताना एखाद्याचा अपघात झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला  काय चित्र दिसते ?


बहुतेक माणस थांबतात , काय झाल.... ? काय झाल .... म्हणून बघतात.   फोटो काढतात . सेल्फी काढतात.

आणि  उभ राहून फक्त  बघत बसतात.

जखमीला मदत करण्याची इच्छा तर सगळ्यांची असते, पण "उगीचच पोलिसांची कटकट नको ,  काय झाल तर आपण फसू"  अशी भीती असते म्हणून  जखमीला मदत करण्यासाठी सहसा पटकन कुणी  पुढे येत नाहीत.


आपल्या देशात वर्षभरात, रोड अपघातात साधारणपणे  १,५०,००० (दीडलाख)  अपघातग्रस्ती  मृत्युमुखी पडतात. त्यातले निम्मा  म्हणजे ७५००० जखमींचा जीव यासाठी जातो कारण  त्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. कारण मदतीसाठी पटकन कुणी पुढे येत नाही.


अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीसाठी सुरुवातीचा १ तास  अतिशय महत्वाचा  असतो . त्याला सुर्वर्ण काळ म्हटले जाते. या दरम्यान जखमी व्यक्तीला जर उपचार मिळाले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.


या गोष्टीवर उपाय म्हणून आपल्याकडे अतिशय महत्वाचा असा  GOOD SAMARITAN कायदा आहे  ज्या बद्दल लोकांना खूपच कमी माहिती आहे . ( Motar Vehicle Act - Sec 134A )

"Good Samritan म्हणजे माणुसकीच्या नात्याने एखाद्या अपघातग्रस्त जखमी व्यक्तीला तुम्ही मदत करत असाल तर तुम्हाला  Good Samaritan म्हटले जाईल."

या कायद्या नुसार तुम्ही अपघातग्रस्त  जखमी व्यक्तीला जर मदत करत असाल , दवाखान्यात पोचवत असाल तर तुम्हाला कायद्याने संरक्षण दिले आहे.

Motar Vehicle Act - कलम (१३४ अ ) नुसार 

ते संरक्षण म्हणजे :

१) तुम्ही तुमची ओळख / व्ययक्तिक माहिती पूर्णपणे गुपित ठेऊ शकता . ( पोलीस किवा आरोग्य यंत्रणा "तुमच नाव सांगा , नंबर सांगा" म्हणून जबरदस्ती नाही करू शकत.  )

२)दरम्यान अपघातग्रस्ताचा जरी मृत्यू झाला तरी तुम्हाला कुणीही जबाबदार  ठरवू शकत नाही . किवा तुमच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही.

३)आरोग्य यंत्रणा तुमचाकडून पैसे नाही मागू शकत.

४) किवा पोलीस तुमचा जबाब (statement) घेण्यासाठी जबरदस्ती नाही करू शकत.  तुमची इच्छा नसेल तर  पोलीस तपासापासून तुम्ही पूर्णपणे लांब राहू शकता.

तसेच सरकार कडून तुम्ही केलेल्या चांगल्या कामा बद्दल  तुम्हाला ५००० रुपये आणि प्रशस्ती पत्रक मिळू शकत.

थोडक्यात सांगायच झाल तर तुम्ही फक्त अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करा , प्रथमोपचार द्या , लवकरात लवकर दवाखान्यात पोचवा . एक चांगला  नागरिक आणि माणुसकी म्हणून तुम्ही  तुमच काम  करा .

बाकी पुढे पोलीस असू दे किवा आरोग्य यंत्रणा असू दे . काय झाल  ? कस झाल सांग  म्हणून तुम्हाला कुणी जबरदस्ती करू शकत नाहीत. किवा तुमच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही.


सर्व प्रगत देशांमध्ये कायद्याची हि तरतूद आपल्याला बघायला मिळते. 

अपघात ग्रस्त जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळावेत आणि मदतीसाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे म्हणून ह्या कायद्याची तरतूद केली आहे. पण ह्या कायद्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे.

अपघातग्रस्त व्यक्तीला सुरुवातीच्या एका तासात आपण उपचार देऊ शकलो तर दर वर्षी साधारणपणे  ७५००० लोकांचे प्राण वाचवण्याची संधी आपल्याकडे आहे. 




Author - Tushar Lahange 

Law Student - GLC Mumbai




Popular posts from this blog

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही

The Road Not Taken

जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...

शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !

दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां

सर्पदंश : एक गंभीर दुर्लक्षित समस्या

F.I.R. / Arrest

साथीचा रोग प्रतिबंधक कायदा आणि त्या मागचा इतिहास

Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update