साथीचा रोग प्रतिबंधक कायदा आणि त्या मागचा इतिहास

(Epidemic Disease Act 1897)



  सध्या कोरोनाची साथ जगभर पसरली असताना आपल्याला सध्या लागु असलेल्या एका १२३ वर्ष जुन्या कायद्या बद्दल ऐकायला मिळते..

ह्या कायद्या बद्दल आणि त्या मागच्या इतिहासाबद्दल अगदी थोडक्यात :

१८९७ साली ब्रिटिश सरकारने हा कायदा अंमलात आणला. हा कायदा खूप छोटा आहे ज्या मध्ये फक्त 4 sections आहेत..

जेव्हा देशात/राज्यात घातक साथीचा रोग पसरला आहे किंवा पसरण्याची शक्यता आहे आणि हा प्रसार रोखण्यासाठी दुसरे असलेले कायदे प्रभावी पणे काम करत नाहीत अशा वेळेस हा कायदा लागू केला जातो.

अशा वेळेस परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार विशेष नियम ,कायदे व उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपात अंमलात आणते...

त्या नियमांचे पालन न केलेल्या व्यक्तीस IPC Sec 188 नुसार कारवाई होवु शकते

 ह्या कायद्या नुसार प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार मिळतात . मात्र कायद्याचे पालन करत असताना अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही .
अशा वेळेस अधिकारी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग  करण्याची शक्यता असते. काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्या काळात  ह्या कायद्याचा दुरुपयोग करून  भारतीयांचे शोषण केले होते..
 .
 .
 .

हा कायदा अस्तित्वात कसा आला त्याबद्दल ,



भारतात वर्ष 1896 च्या दरम्यान Bubonic Plague ची साथ पसरली होती. Bubonic Plague हा Yersinia pestis या बॅक्टेरिया मुळे होतो. जो की उंदीर/घूस याच्या शरीरावर असलेल्या पिस्सु (Flees) या सूक्ष्म जीवां मार्फत पसरतो.. bubonic plague हा मानवी इतिहासातील सर्वात भयंकर साथीच्या रोगांपैकी एक आहे..याचा प्रसार सुद्धा चीन मधून जगभर झाला होता..इतिहासात Bubonic plague ला BLACK DEATH सुद्धा म्हटलं आहे..

 त्या काळी व्यापार हा मोठ्या प्रमाणात जहाजांमार्फत होत असे आणि जहाजांमध्ये उंदीर/घुस मोठ्या प्रमाणात असत , त्यांमार्फत Bubonic Plague हा Bombay Presidency व येथून भारतभर पसरला.
  सुरुवातीच्या टप्प्यात ब्रिटिशांनी Plauge च्या साथीकडे दुर्लक्ष केले व त्यांचा व्यापार चालू ठेवला, कारण भारतात व्यापार करणे , इथल्या मालाची निर्यात करणे व नफा मिळवणे हेच ब्रिटिशांचे मुख्य धोरण होते..
  परिणामी Plague ची साथ झपाट्याने पसरायला लागली तेव्हा प्लेग चा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटिशांनी 1897 साली Epidemic Disease Act अंमलात आणला. ह्या कायद्यानुसार ब्रिटिश अधिकाऱ्यांना विशेष अधिकार मिळाले जसे की , साथीची लागण झालेल्या व्यक्तींना किंवा संशयितांना ताब्यात घेणे व वेगळे ठेवणे, व्यक्तींची झडती घेणे, घराची झडती घेणे , सामानाची तपासणी करणे..

एक special plague committee  स्थापन केली , Walter C. Rand या ब्रिटीश अधिकाऱ्याची  प्लेग कमिशनर  म्हणून नियुक्ती करण्यात आली ..
सुरूवातीला Walter Rand ने प्लेग चा प्रसार रोखण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले व नंतर पुढे जेव्हा साथ मोठ्या प्रमाणात पसरली तेव्हा हा कायदा कठोर पणे अंमलात आणला..इतिहासकारांच्या मते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ह्या कायद्याचा दुरूपयोग करून भारतीयांवर अत्याचार केले..
   बाळ गंगाधर टिळकांनी या अत्याचारबद्दल केसरीमराठा या वृत्तपत्रांमधून टीका केली होती. पुढे टिळकांच्या लेखांपासून प्रेरित होऊन चाफेकर बंधु (दामोदर, बालकृष्णा, वासुदेव)यांनी Water Rand ची हत्या केली..यासाठी  टिळकांना १८ महिने तुरुंगवास भोगावा लागला ..
Walter Rand च्या हत्येबद्दल इतिहासकारांची दोन मते आहेत काहींनी Walter Rand च्या हत्येचे समर्थन केले आहे तर काहींनी टीका केली आहे..






पुढे ब्रिटिश सरकार नियुक्त रशियातील जिवाणूशास्त्रज्ञ (bacteriologist) Waldemar Haffkine यांनी प्लेगच्या  लसीची(Vaccine) मनुष्य चाचणी आधी स्वतःवर व नंतर १० जानेवारी १८९७ साली Byculla Jail मधील एका कैद्यावर केली . पुढील काही वर्षात ही साथ आटोक्यात आणण्यात आली..

(या आधीसुद्धा  १८९२ साली Waldemar Haffkine यांनी Cholera च्या लसीचे संशोधन केले होते)

प्लेगच्या साथी मुळे वर्ष १९०१ पर्यंत जवळपास ४ लाख तर
१९०५ पर्यंत जवळपास १० लाख भारतीयांच्या मृत्यूची नोंद आहे.

 साथीच्या  रोगांचा प्रसार रोखण्यासाठी Epidemics Disease Act 1897 हा कायदा आतापर्यंत प्रभावी ठरला आहे..
साथीचा  प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी हा कायदा अंमलात आणला आहे.
तरी ह्या कायद्याच्या मुख्य हेतू हा Social Distancing चे पालन करून घेणे  आहे..
म्हणून ,

Social Distance पाळा आणि Corona टाळा













खाली दिलेल्या लिंक मार्फत हा कायदा तुम्ही PDF format मध्ये Download करू शकता..

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://indiacode.nic.in/bitstream/123456789/10469/1/the_epidemic_diseases_act%252C_1897.pdf&ved=2ahUKEwiozrGGidPoAhUIxTgGHUirAh8QFjAAegQIARAB&usg=AOvVaw12Gr1gfnKmBbUfl8kxUE4j

Popular posts from this blog

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही

The Road Not Taken

जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...

शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !

दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां

सर्पदंश : एक गंभीर दुर्लक्षित समस्या

F.I.R. / Arrest

Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update

GOOD SAMARITAN LAW