Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update
बोईसर :
स्वदिच्छा साने MBBS चे शिक्षण घेत असणारी २२ वर्षीय होतकरू तरुणी, दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई बांद्रा (Band Stand ) येथून बेपत्ता झाली होती. बोईसर पासून परीक्षेला मुंबईला गेलेली तरुणी परत घरी परतलीच नाही.
ह्या केस मध्ये एकमेव संशयित होता मिठ्ठू सिंग . त्याने स्वदिच्छा ला शेवटचे बघितले होते तसेच तिच्या सोबत शेवटचा सेल्फी घेतला होता . असे असताना सुद्धा त्या वेळेस पोलिसांनी मिठ्ठू सिंग ची सखोल चौकशी न करता क्लीन चीट देऊन सोडून दिले होते. किवा त्या घटनेचा पाहिजे तसा तपास केला नाही.
नंतर ती केस क्राईम ब्रांच कसे सोपवण्यात आली असता आता त्या केस मध्ये नवीन उलगडा झाला. आता संशयित मिठ्ठू सिंग ने स्वदिच्छा ची हत्त्या करून बॉडी समुद्रात फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे .
सदर घटने मध्ये आता पोलिसांकडून बॉडी शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत मात्र इतक्या वर्षानंतर आता पुरावे सापडतील अस वाटत नाही.
मुळात पोलीस यंत्रणेच हे मोठ अपयश आहे . सुरुवातीच्या काळात जेव्हा स्वदिच्छा बेपत्ता झाली होती तेव्हा मात्र पोलिसांकडून FIR दाखल करताना टाळाटाळ झाली. "कि तरुण मुलगी आहे कोणासोबत तरी पळून गेली असेल" अस बेजबदार वक्त्यव तेव्हाचे अधिकारी "Dy.SP नित्यानंद झा" यांनी केले होते . आणि FIR उशिराने दाखल केली होती.
कोणत्याही गुन्ह्यामध्ये तपासाच्या दृष्टीकोनातून बघायचे झाले तर सुरुवातीचा काळ हा फार महत्वाचा असतो . कारण तपासामध्ये जेवढा उशीर होतो तेवढी गुन्हेगाराला पुरावे नष्ट करण्याची संधी मिळते.
----------------------------
स्वदिच्छा च्या वडिलांची मुलाखत