दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां
दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां (दवाखान्यात जावू नका कोरोनाची लस घेवू नका, दवाखान्यात इंजेक्शन देऊन डॉक्टर मारून टाकत आहेत ) सध्या साधारणपणे अशा प्रकारची वाक्ये ग्रामीण भागात लोकांच्या तोंडून सहज ऐकायला मिळत आहेत.
वय वर्ष 45 च्या पुढील सोबतच आता 18 वर्ष पुढील वयोगटातील व्यक्तिंसाठी आता कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण ग्रामीण भागातील लोंकांचे लस घेण्याचे प्रमाण कमीच आहे. लोकांच्या मनात लसी विषयी भीती आणि चुकीची माहिती आहे.
कालची गोष्ट आहे, माझे मामा ज्यांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त आहे ते बांधन गावाकडे लसीकरण कॅम्प लागला होता तिथे जाऊन लस घेऊन आले. तिथे सुद्धा लसी विषयी स्थानिक लोकांची उदासीनता होती. लसीचे अगदी 150 डोस उपलब्ध होते, त्यातील फक्त साधारणपणे 20 डोस संपले होते आणि ते सुद्धा शहरातून व आजूबाजूच्या तालुक्यातुन आलेल्या लोकांनी संपवले होते. तिथले स्थानिक लोक लस घेण्यासाठी येत नव्हते.
जर तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमच्या आजूबाजूला लोकांच्या मनात लसी विषयी भीती आणि उदासीनता असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता :
१) कोरोना प्रतिबंधात्मक "लस" ही आपले प्राण वाचविण्यासाठी बनवली आहे मारण्यासाठी नाही हे पटवून देऊ शकतो.
२) लसी साठी नोंदणी कुठे व कशी करता येईल याबद्दल माहिती द्यावी.
३) लस घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस ताप, अंगदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे असा त्रास होत असेल तर ते अगदी सर्व साधारण आहे. त्रास झाला तर दवाखान्यात जाऊन औषध-गोळ्या घेऊ शकतो, त्यात घाबरून जाण्यासारखे काही नाही. आणि लस घेतल्यानंतर त्रास होईलच असंही नाही.
याबत त्यांना समजावून सांगावे.
४) तुम्ही स्वतः सुद्धा लस घ्या आणि दाखवून द्या की लस घेतल्याने कोरोना विरुध्द लढ्यात तुमचा फायदाच आहे आणि तुमची सुरक्षितता वाढली आहे.
आमच्या इकडे एका व्यक्तीचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला. तेव्हा लोकांनी अशी अफवा पसरवली की, त्याने तर लसीचे दोन्ही डोस घेतले होते तरी सुद्धा त्याला कोरोना झाला आणि तो गेला. पण खर म्हणजे त्या व्यक्तीने लसीचा एकही डोस घेतला नव्हता.
लस घेतल्यावर सुद्धा आपण काही गोष्टीत पाळल्या पाहीजेत:
१)लसीकरणाच्या वेळी आपल्या ला काही आजार ,त्रास असेल तर त्याची पूर्व कल्पना डॉक्टरांना द्यावी.
२) लस घेतल्यावर ३- ४ दिवस वजन काम करू नये. आराम केला पाहीजे.
३)त्रास झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध गोळ्या घ्याव्यात.
४) लस घेतल्यावर दारू, सिगरेट , गुटखा , तंबाखू इ. मद्यपान व नशा करणे टाळावे..
लस घेतल्यानंतर कोरोना ची लागण होणारच नाही असही नाही.
लस घेतल्यावर सुद्धा आपण मास्क लावणे , Sanitizer लावणे ही काळजी तर घेतली पाहिजे.
पण लस घेतली असेल आणि जर कोरोना ची लागण झाली तर तुम्ही लवकर बरे व्हाल.
लसीमुळे तुमच्या शरीरात कोरोना विरुध्द लढण्यास Antibodies तयार झालेल्या असतात.
लस घेतलेल्या पैकी फक्त 0.03 % ते 0.04 % लोकांना कोरोनाची लागण झाली होती.पण लस घेतली असल्यानं त्यांना कोरोनाचा जास्त त्रास झाला नाही. आणि कोरोनाची लक्षणे सुद्धा किरकोळ स्वरूपाची होती.
एखाद्या गोष्टी विषयी कमी आणि चुकीच्या माहिती मुळे आपल्या मनात भीती पसरत असते.
किमान आपले शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना लसीविषयी जागरूकता निर्माण करून आपण त्यांची मदत करू शकतो.
Author - Tushar Lahange
(Photo Credit : T. Narayan/Bloomberg News)
#covid19 #vaccination #rural #india