शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !
खूप खूप वर्षांपूर्वी ... विक्रमगड हायस्कूल मध्ये शिकत असताना एकदा एक शिक्षक, शिकवता शिकवता सहज म्हणाले होते की " शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये "!. तेव्हा हे वाक्य माझ्या पहिल्यांदा ऐकण्यात आले होत. तेव्हा त्यांच म्हणण पटलही होत, कारण सर म्हणत आहेत तर बरोबरच असेल. पण आता मी जेव्हा स्वतः कायद्याचे शिक्षण घेत आहे आणि आता दोन गोष्टी जरा जास्त चांगल्या प्रकारे समजतात. तर आता ह्या वाक्याशी मी अजिबात सहमत नाही. " शहाण्या ने कोर्टाची पायरी चढू नये " हे म्हणजे अस झाल की आजारी पडल्यावर दवाखान्यात जावू नये.. किंवा तहान लागल्यावर पाणी पिऊ नये... इत्यादी... इत्यादी... समजा तुमच्या सोबत अन्याय झाला आणि तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची नाही मग तुमच्या पुढे दोनच पर्याय राहतात : १) एक तर झालेला अन्याय गपचूप सहन करा किंवा २) स्वतः कायदा हातात घेऊन काहीतरी बेकायदेशीर कृत्य करा वगेरे.. आणि हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत.. उलट गरज असेल तेव्हा , शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली पाहिजे (कायदेशीर मदत घेणे) असच मी म्हणेन ! नक्कीच पोलीस प्रशासनात भ्रष्ट अधिकारी/कर्म