Palghar Minor Girl Murder case 2021

 



मागील महिन्यात, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ८ वर्षाच्या चिमुकलीची हत्या झाली त्या गुन्ह्या बाबत थोडक्यात :
दिनांक २७/०९/२०२१ रोजी रानशेत-वांगडपाडा गावात ८ वर्षीय लहान मुलीची कोयत्याने निर्घुण हत्या झाली.
हत्या होत असताना गावातील एका व्यक्तीने ते बघितले व मुलीच्या बचावासाठी गेला असताना आरोपीने त्याच्यावर सुद्धा हल्ला करून गंभीर दुखापत पोचवली व आरोपी तिथून पळून गेला.
तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपी "प्रमुल घोषे" यास ताब्यात घेतले तसेच हत्ये साठी वापरलले शस्त्र (कोयता) सुद्धा ताब्यात घेतला.
आरोपी हा मुलीचा नातेवाईक आहे आणि कौटुंबिक जमीनीच्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने हे कृत्य केले असावे असे प्रथमदर्शनी दिसून येते.
सुरुवातीला आरोपीविरुद्ध ,
IPC- 302 ( Murder )
IPC- 307 ( attempt to Murder )
कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
Post Mortem रिपोर्ट मध्ये, पिडीतेवर शारीरिक अत्याचार करून हत्या करण्यात आणि असे दिसून आले त्यानुसार अतिरिक्त कलम लावण्यात आले आहेत.
IPC-302, IPC-307 सोबत
IPC -376- Rape
IPC -377- unnatural/carnal intercourse
तसेच
POCSO ( बाल लैंगिक शोषण विरुद्धचा कायदा ) अंतर्गत कलम
4,6,8,12 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सदरचा खटला "पालघरच्या जिल्हा न्यायालयात" चालू आहे.
आरोपीविरुद्ध ठोस पुरावे आणि थेट साक्षीदार आहेत. ह्या केस मध्ये सरकारी पक्षाची बाजू मजबूत आहे. गुन्हे सिद्ध झाले तर आरोपीस "जन्मठेप" किंवा "फाशी" ची शिक्षा होईल.
फाशीची शिक्षा हि क्वचितच दुर्मिळातील दुर्मिळ केस मध्ये होत असते.
ह्या गुन्ह्याचे स्वरूप आणि गंभीरता पाहता हि नक्कीच दुर्मिळ केस आहे आणि आरोपी फाशीच्या (मृत्यू दंड) शिक्षेसाठी पात्र आहे, असे माझे मत आहे.
ज्या प्रकारे हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि POCSO कायद्या अंतर्गत हा खटला चालु आहे, जवळपास एक वर्षभरात ह्या खटल्याचा निकाल लागणे अपेक्षित आहे.

Popular posts from this blog

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही

The Road Not Taken

जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...

शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !

दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां

सर्पदंश : एक गंभीर दुर्लक्षित समस्या

F.I.R. / Arrest

साथीचा रोग प्रतिबंधक कायदा आणि त्या मागचा इतिहास

Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update

GOOD SAMARITAN LAW